मुंबई / नगर सह्याद्री : नोकरी शोधणाऱ्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी आहे. 400 हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. 16 जानेवारी 2024 ही भरती प्रक्रियेची अंतिम तारीख आहे.
विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया असून centralbankofindia.co.in. च्या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. 18 ते 26 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास असणाऱ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एक मोठी संधी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उपलब्ध झाली आहे.
अर्ज कसा करावा
– Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा
– उमेदवार भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा आणि अर्ज लिंकवर क्लिक करा.
– Click here for New registration वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
– नोंदणीनंतर उमेदवारांनी इतर माहितीसह स्वाक्षरी, छायाचित्र अपलोड करावे.
– अर्ज शुल्क जमा करा, सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या
अर्ज शुल्क
अर्जाचे शुल्क सर्वसाधारण / OBC / EWS श्रेणीसाठी रुपये ८५० आणि SC/ST श्रेणीसाठी रुपये १७५ आहे.