spot_img
अहमदनगर'जिजाऊ ब्रिगेड'चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

spot_img

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या रौप महोत्सवी वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक दिमाखात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवमती सुजाताताई ठुबे होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, विभावरी ताकट, उपाध्यक्ष वर्षाताई माने, डॉ. अश्विनी देवकी, जिल्हाध्यक्ष ऍड. स्वातीताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

अहिल्यानगर जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेड सक्षमपणे काम करत असल्याने जिल्हाध्यक्ष सौ.स्वाती ताई जाधव यांच्या कार्याचा देखील विशेष गौरव या ठिकाणी करण्यात आला. सृष्टी फाउंडेशन च्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबवलेल्या अभ्यासिका व मदतीची विशेष दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. व संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संघटन बांधणीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. जिजाऊ ब्रिगेड चे संघटन ताकतीने उभे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला प्रत्येक तालुयात संघटन उभे करून महिला अन्याय विरुद्ध जोरदार संघर्ष करण्याची आमची तयारी असून कोणत्याही जाती धर्माच्या महिलांवरील अन्याय अत्याचार विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार असून लवकरच प्रत्येक तालुयात पुनर्बांधणी करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष स्वाती जाधव यांनी जाहीर केले.

या बैठकीत हुंडा घ्यायचा नाही आणि द्यायचा नाही या सामाजिक संदेशावर सर्वांनी एकमुखाने शपथ घेतली. गेल्या वर्षभरात महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रभावी उजळणी करण्यात आली. ८ मार्च रोजी सृष्टी कम्प्युटर्सतर्फे मोफत कोर्स आयोजित केल्याचे कौतुक करण्यात आले. यासोबतच हळदी-कुंकू समारंभ, महिला सभा, तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात झालेल्या क्रांतिकारी उपक्रमांची माहिती देण्यात आली. आगामी वर्षात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या योजना आणि उद्दिष्टे यावर भर देण्यात आला.

हुंड्यासाठी त्रास होत
असेल तर संपर्क करा
अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही महिलेला हुंड्यासाठी त्रास होत असेल किंवा महिलेवर अत्याचार होत असेल तर त्या महिलांनी जिजाऊ ब्रिगेड संपर्क करावा. जिजाऊ ब्रिगेड त्यांच्या पाठीशी शेवट पर्यंत उभा राहील
– अ‍ॅड.स्वाती जाधव (जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...