spot_img
अहमदनगर'सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद'

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 महिन्यानंतर जेरबंद केले. त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दि.२५ जानेवारी रोजी योगेश खंडू शेरकर यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपीतांनी प्रवेश करून, फिर्यादी व त्यांचे आईस मारहाण करत कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने व एक दुचाकी चोरट्याने चोरुन नेली होती. त्याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी सदर गुन्ह्यातील आरोपी सिध्देश सादीश काळे ( रा. वाळुंज पारगाव, ता.अहिल्यानगर ), श्रीहरी हरदास चव्हाण ( रा.वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर ) यांना अटक केली होती. तर नमूद गुन्हयातील इतर आरोपी फरार झाले होते. सदर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना दिल्या.

दरम्यान,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागेश विक्रम भोसले ( रा.घोसपुरी, ता.अहिल्यानगर ), पवन राजु भोसले ( रा.कोपरगाव,जि.अहिल्यानगर ), देविदास जैनु काळे ( रा.बिलोणी, ता.वैजापूर ), ऋतीक पैदास चव्हाण ( रा.बिलोणी, ता.वैजापूर ), उमेश रवी भोसले ( रा.नक्शीनगर, कोपरगाव ) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली.

ताब्यातील आरोपी नागेश विक्रम भोसले यास विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता त्यांने सदरचा गुन्हा पवन राजु भोसले, देविदास जैनु काळे, सिध्देश सादिश काळे, अजय सादिश काळे (फरार), धीरज सादिश काळे (फरार), गणेश सुरेश भोसले, श्रीहरी हरीदास चव्हाण, बाळु झारू भोसले, आवडया सुभाष उर्फ ठुब्या भोसले, यांचेसह केला असून चोरी केलेला मुद्देमाल आपसामध्ये वाटुन घेतला असल्याची माहिती दिली.

आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून सुपा पोलीस ठाण्यातील दोन, बेलवंडी पोलीस ठाण्यातील एक, एमआयडीसीतील पोलीस ठाण्यातील एक, नारायणगाव पोलीस पाहण्यात एक असे पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासकामी आरोपींना पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, हृदय घोडके, भाऊसाहेब काळे, बाळसाहेब खेडकर, अमोल कोतकर, आकाश काळे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे यांनी बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...