spot_img
ब्रेकिंगजयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले! 'शिवस्वराज्य' यात्रेच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय...

जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले! ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

पुणे । नगर सहयाद्री: –
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. असे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही आज (9 ऑगस्ट) रोजी शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

या यात्रेच्या पहिल्याच दिवशी जुन्नर शहरात एक मोठी दुर्घटना टळली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला होता. क्रेन पुतळ्याच्या दिशेने खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे थोडक्यात बचावले.

या घटनाक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे यात्रेत काही काळ गोंधळ उडाला, परंतु त्यानंतर यात्रा पुढे सुरू ठेवण्यात आली.यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...