अकोले | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले आहे. शेकडो नागरिकांवर उपचार सुरु आहेत. उपचारा दरम्यान 22 वषय प्रियंका शेंडे या तरूणीचा मृत्यू झाला. दुषित पाण्यामुळे शेकडो नागरीक बाधित झाले असून शासकीय त्याचप्रमाणे अनेक खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
काविळच्या थैमानामुळे नागरीक धास्तावले असून आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने उपापयोजना सुरू केल्या असल्या तरी लवकरात लवकर काविळचा फैलाव थांबवणं गरजेचं आहे. कावीळ ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण वाढतं. परिणामी त्वचा आणि डोळे पिवळे होतात.
ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये यकृताचे नुकसान, पित्ताशयाचे खडे, संसर्ग, किंवा काही अनुवांशिक विकार यांचाही समावेश आहे. कावीळीवर कसे उपचार करावेत हे त्याची कारणं आणि तीव्रता यावर अवलंबून असतं. सौम्य कावीळ काही दिवसांत आपोआप बरी होऊ शकते. तर गंभीर कावीळ झाली असल्यास त्यासाठी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.