spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांची शुगर खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल: डॉक्टर म्हणाले, परिस्थिती..

जरांगे पाटलांची शुगर खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल: डॉक्टर म्हणाले, परिस्थिती..

spot_img

बीड | नगर सह्याद्री-

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात त्यांनी जाहीर सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. सोमवारी (दि. ११) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सभा चालू असताना त्यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अंबाजोगाई येथील सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, खूप उपोषणे केल्यामुळे शरीर साथ देत नाही. बहुतेक सरकार त्यांचे ऐकून आपल्यावर अन्याय करण्याच्या विचारात दिसत आहे. आपल्यावरील गुन्हे मागे घेऊ म्हणाले, तेही घेतले नाहीत. मी माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मांडत आहे. मला फक्त समाजासाठी आरक्षण हवे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही, हा शब्द आहे माझा.

परिस्थिती काळजी करण्यासारखी: डॉ. थोरात

अंबाजोगाईमधील थोरात रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. सततचा प्रवास आणि दगदगीमुळे अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉटरांनी सांगितले. डॉ. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांना बोलताही येत नव्हते. १७ दिवस उपोषण केल्यानंतर ते सतत फिरत आहेत. त्यांची शुगर कमी झाली आहे. त्यांची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. आम्ही रक्त चाचण्या केल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरविण्यात येईल.

मला डॉक्टरांनी दोन-तीन महिने आराम करण्यास सांगितले आहे. माझ्या किडनी आणि यकृताला सूज आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विजयाचा क्षण जवळ आला असताना मी आराम केला तर माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होईल. त्यामुळे जीवाची पर्वा न करता मी जागृती करण्यास राज्यभर फिरत आहे. मागच्या दोन-तीन दिवसांत माझी प्रकृती ठिक नाही, त्यामुळे मला अनेकांना भेटता येत नाहीये.

मराठा आरक्षणासाठी समाजाने एकजूट राहावे, असा संदेश देतानाच मराठा समाजाने व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ते म्हणाले, सर्व समाजाने व्यसनांपासून दूर रहावे. एकिकडे आपले शेत साथ देत नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो. मुलही इतके शिकून त्यांना नोकर्‍या लागत नाहीत. त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवा आणि व्यसनांपासून दूर रहा. हे केले तर आपली प्रगती कुणीच रोखू शकत नाही.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...