spot_img
ब्रेकिंगजामखेड कडकडीत बंद!, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा

जामखेड कडकडीत बंद!, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
मस्साजोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून समस्त जामखेडकरांच्या वतीने बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवप्रेमी नागरिकांनी सकाळी दहा वाजता खर्डा चौकातून सदर घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा व घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा बॅनर घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सर्व शिवप्रेमींनी सदर घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याचे निवेदन तहसीलदार यांना देऊन तहसील आवारातच सर्व आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचे क्रूर फोटो दि. ४ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवार दि. ५ रोजी जामखेड शहर व तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील खर्डा चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे पांडुरंग भोसले, सुर्यकांत मोरे, कृष्णा सातपुते, मंगेश आजबे, प्रदिप टाफरे, डॉ भगवान मुरूमकर, दत्तात्रय वारे,राजेंद्र गोरे,शरद कार्ले, विकास राळेभात, अँड. प्रमोद राऊत, अवधूत पवार, दादासाहेब सरनोबत, संजय काशिद,पवन राळेभात, प्रशांत राळेभात,राहुल उगले, कुंडल राळेभात, गणेश काळे,गोरख घनवट,डॉ कैलास हजारे,डॉ प्रशांत गायकवाड, डॉ भरत देवकर, डॉ अविनाश पवार,बापूसाहेब कार्ले, बाळासाहेब खैरे,नय्युम सुभेदार,अशोक पोटफोडे, विनायक ढाळे, अँड. हर्षल डोके, अँड. ऋषिकेश डूचे, प्रविण बोलभट, बंडू मुळे,तात्यासाहेब बांदल, नरेंद्र जाधव, प्रविण उगले, महादेव डूचे,काकासाहेब कोल्हे, आण्णासाहेब काशिद,आण्णासाहेब ढवळे,गणेश हगवणे, सचिन काशिद , बाळासाहेब ठाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या! 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. यामुळे समाजात चीड निर्माण झाली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गुन्हेगारांना जात नसते ते कोणत्या समाजाचे आहेत हे न पाहता या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा.
– पांडुरंग भोसले, तालुकाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...