spot_img
ब्रेकिंगसंतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट, जामखेड कनेक्शन आले समोर; झाली सीआयडी चौकशी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट, जामखेड कनेक्शन आले समोर; झाली सीआयडी चौकशी

spot_img

 

पक्षाची पदाधिकारी म्हणून चौकशी – संध्या सोनवणे
जामखेड / नगर सह्याद्री
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामखेड कनेक्शनची चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा व स्टार प्रचारक संध्या सोनवणे यांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात आली आहे. यामुळे जामखेड परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी पक्षाची पदाधिकारी म्हणून माझी चौकशी करण्यात आली असे संध्या सोनवणे यांनी सांगितले.

वाल्मिक कराड बरोबर काही संबंध होते का? यांची चौकशी सीआयडी मार्फत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सोनवणे या जामखेड च्या असून विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या त्या स्टार प्रचारक होत्या. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरु आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्च्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती. या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींचा महिना होत आला तरीही काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी सरु असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात संध्या सोनवणे यांची का चौकशी करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यात फरार असेलेले वाल्मिक कराड यांची संपत्ती आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस च्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, पदाधिकारी यांची चौकशी करण्यात येत आहे. पक्षाची पदाधिकारी म्हणून माझी चौकशी करण्यात आली आहे. निवडणूक काळात अनेकांशी फोनवर संपर्क झालेला होता. यामुळे चौकशी करण्यात आली आहे असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...