spot_img
अहमदनगरअहमदनगरमधील 'येथील' जलजीवन पाणी योजनेचे काम निकृष्ट? चौकशीस सुरवात  

अहमदनगरमधील ‘येथील’ जलजीवन पाणी योजनेचे काम निकृष्ट? चौकशीस सुरवात  

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील ढोकी गावच्या जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असा आरोप होत आहे. या कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची समिती नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेने ३१ मार्च पर्यंत या ठेकेदाराची मुदत वाढवली असून हे बेकायदेशीर  असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक नगर सह्याद्रीने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा परिषदेने स्वतंत्र अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमणूक केली. २ ते ३ दिवसापूर्वी ढोकी गावातील जलजीवन च्या कामाची चौकशीचा अर्ज  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती या ठिकाणी केला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने के.बी. गुरव व पारनेर पंचायत समिती पाणी पुरवठा शाखा अभियंता पी.पी.पंडित रावसाहेब, ग्रामसेवक भाऊसाहेब या ठिकाणी आले असता या कामाची पाहणी केली.

सन २०२२ मध्ये ढोकी गावच्या जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी १ कोटी ९९ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला. २२ जून २०२२ रोजी यादी तांत्रिक मान्यता देण्यात येवून १ ऑक्टोबर २०२२ रोजी इलेक्ट्रिकल अँड इंडस्ट्रियल या एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. जलजीवन मशीन ची पाणी योजना करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी म्हणजे १ आॅक्टोबर २०२३ रोजी पर्यंत देण्यात आला होता. परंतु सदर एजन्सी निवड ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले असून अनेक ठिकाणी पाईप जमिनीवर ठेवून त्याच्यावर सिमेंट टाकण्यात आलेले आहे. तर अनेक ठिकाणची पाईपलाईन उघड्यावर असून पाण्याच्या टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे.

या निवेदनावर प्रशांत धरम, गोरक्ष मोरे, कैलास नर्हे, बाबासाहेब नर्हे, नवनाथ वाकचौरे, अब्दुल पठाण, बाळू वाकचौरे, शिवाजी चितळकर, अक्षय वाकचौरे, बापू नर्हे, भास्कर डोलनर, प्रकाश मोरे, हुसेन पठाण, रावसाहेब डोईफोडे, अशोक नर्हे, धोंडीभाऊ धरम, बाजीराव मोरे, भाऊसाहेब भुसारी, सिंधू पवार, भगवान मोरे प्रवीण धरण तात्या भाऊ मोरे भाऊसाहेब मोरे किसन धरम सागर धरण सयाजी धरम शांताराम धरम, अक्षय धरम, मोहन डोईफोडे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...