अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करून विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून टाकली. यामुळे देशातील समस्त जैन समाज अत्यंत आक्रोषित आहे. या संदर्भात अहिल्यानगर येथे सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कापडबाजार येथील जैन मंदिर, कापड बाजार, दाळ मंडई, आडते बाजार, धरती चौक यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर येथे गेला. यावेळी जैन समाजाच्या वतीने प्रांत सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. जैन समाजाच्या मंदिराचे बोगस खरेदीखत रद्दबातल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरत तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मोर्चेकर्यांतर्फे करण्यात आली.
या मोर्चात जैन समाजाचे नरेंद्र फिरोदिया, वसंत लोढा, नरेंद्र लोहाडे, अॅड. नरेश गुगळे, किशोर मुनोत, अनिल पोखरणा, संतोष गांधी, बाबुशेठ बोरा, शैलेश मुनोत, सीए अशोक पितळे, सुमतीलाल कोठारी, संजय चोपडा, सीए अजय मुथा, संजय महाजन, सचिन कटारिया, महावीर गोसावी, कुणाल बडजाते, राजेंद्र बलदोटा, अजित कर्नावट, मनोज गुंदेचा, किरण काळे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, विक्रम राठोड, अजय गंगवाल, कुणाल भंडारी, महावीर बडजाते, शिरीष बेगडे, अमित मुथा, किशोर मुनोत, अजय बोरा, रणधीर लोखंडे, प्रशांत प्रांगळ, अशोक भंडारी, अनिल कोठारी, संतोष भोसे, संपतलाल मुथियान, प्रशांत मुथा, दिलीप कटारिया, संजय कटारिया, रचना चुडीवाल, सरोज कटारिया, आरती लोहाडे, सारिका बडजाते, सौरवी धोंगडे यांच्यासह अन्य जैनबांधव सामील झाले होते.



