अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
आयुष्यातील सगळे दुःख उरात घेऊन लेकरांना मायेची ऊब देणारा बाप बाहेरून कठोर वाटत असला, तरी आतून तो प्रेमळ असतो. बाप-लेकीचे नाते अलौकिक असते. बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण…संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो.
अशा बाप-लेकीची अचानक पणे ताटातूट झाल्यास आधारवड हरपल्यास कठीण प्रसंगाला समोर जावं लागत. नुकतीच नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे एक हृदयकारक घटना घडली. वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसर्या दिवशी मुलीनेही प्राण सोडले. बाळासाहेब गेणदास जाधव व श्रद्धा बाळासाहेब जाधव असे बापलेकीचे नाव आहे.
नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे जाधव कुटूंब वास्तव्यास आहे. बाळासाहेब गेणदास जाधव यांचे निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वडीलांच्या निधनाचा धक्का बसल्तामुळे श्रद्धाला श्रीरामपूर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र रात्री 12:30 च्या दरम्यान उपचारादरम्यान तीचेही निधन झाले. श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. बाप-लेकीच्या निधनाच्या या घटनेमुळे शिरेगावबरोबर मुळाकाठ परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.