spot_img
देश"आमच्या विकासाची दृष्टीही घेतली असती तर बरं झालं असतं"

“आमच्या विकासाची दृष्टीही घेतली असती तर बरं झालं असतं”

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त कराच्या रूपातून पैसा केंद्र सरकारला जात असताना त्याचा परतावा मात्र होताना दिसत नाही. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून तरतूद केली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या उपकारांची परतफेड करताना महाराष्ट्रासारख्या राज्यांकडे मात्र पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे एनडीएतील महत्त्व कमी झाले, त्यांची दखल घेतली जात नाही हे यावरून स्पष्ट होतं, असेही आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे बोलले जात आहे. अशातच हा अर्थसंकल्प सादर होताच राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना या बजेटने महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पाने पुसली, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी यांनी केली आहे.

महिला आणि मुलींसाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा केवळ आभासी घोषणा केल्या आहेत. तरुणांना केवळ एक वर्षासाठी इंटर्नशिपचे गाजर दिले आहे. याने मूळ बेरोजगारीची समस्या कमी होणार नाही. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही गोष्टी उचलल्या असल्याचे दिसते, मात्र काँग्रेसची विकासाची दृष्टी ही घेतली असती तर बरं झालं असतं. असा टोलाही आमदार यशोमती ठाकूर यांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वक्फ बोर्डबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

३ सदस्य बिगर मुस्लिम राहतील, पण ५ वर्षांची अट नाकारली नवी दिल्ली / वृत्तसंस्था - वक्फ...

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

“रस्त्यावर कचरा नकोच आता…, नाही सहन होणार रस्त्यावरील घाण आता…”

हातात फलक, ओठांवर घोषणा घेऊन नागरिकांची स्वच्छता रॅली अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील सर्वत्र साचलेल्या...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...