Maharashtra Crime News: लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वर्गशिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक माहिती अशी: लातूर जिल्ह्यातल्या एका गावातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली. विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
अण्णा श्रीरंग नरसिंगे असं आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आरोपी विद्यार्थिनींसोबत अश्लील बोलत होता, अपमानास्पद बोलून असभ्यवर्तन कर होता तसंच त्यांचा विनयभंग करत होता असं तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत अधिकचा तपास एमआयडीसी पोलिस अधिकारी करत आहेत.
दरम्यान, विशाखा समितीने पीडित विद्यार्थिनींशी संवाद साधला. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील पीडित विद्यार्थिनींशी विशाखा समितीच्या सदस्यांनी संवाद साधत जबाब नोंदवून घेतले आहेत. यामध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर या शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.