spot_img
अहमदनगरआगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात 'तो' पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘तो’ पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नफ राबवण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाणार आहे. याविषयीची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दादा भुसे हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील मोठी घोषणा केली. याविषयी बोलताना दादा भुसे यांनी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नफ देखील राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीला सीबीएसई पॅटर्नफ लागू होईल, असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अन्य इयत्तांचा सीबीएसई पॅटर्न लागू होईल, त्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.त्या शाळा बंद होणार नाहीत.

पुढे बोलताना दादा भुसे यांनी, या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्याथ संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्याथ संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेची कारवाई; पाच घर सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले

थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा लाभ घेऊन तत्काळ कर भरावा व कारवाई टाळावी; आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

संग्राम जगताप : ज्वलंत हिंदुत्वाचा भगवा अंगार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांना फाट्यावर मारणारा अजित पवार यांच्या गटातील राज्यातील एकमेव...

सत्तांतरामुळे बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये टळली’; डॉ. सुजय विखे पाटील यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि...

दोन शाळकरी मुलींचे अपहरण; घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील एका होस्टेल मध्ये शिकणाऱ्या दोन 14 वषय अल्पवयीन मुलींना अनोळखी...