spot_img
अहमदनगरनगरमध्ये आधी केलंय आता पारनेरमध्ये करुन दाखवणार; नेमकं काय म्हणाले संदेश कार्ले...

नगरमध्ये आधी केलंय आता पारनेरमध्ये करुन दाखवणार; नेमकं काय म्हणाले संदेश कार्ले पहा..

spot_img

नगरप्रमाणेच पारनेर तालुक्यातील प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. परंतु, पारनेर-नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले हे विधानसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढवत आहेत. प्रचारात कोणावरही टीका टीपण्णी न करता मी आत्तापर्यंत काय केलय आणि यापुढे काय करणार आहे यावर भर देत आहेत. नगर तालुक्यात आधी करुन दाखवलंय आणि आता पारनेर तालुक्यात करुन दाखवणार असल्याचा आत्मविश्वास अपक्ष उमेदवार संदेश कार्ले मतदारांना देत आहेत.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्या नगर तालुक्यातील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच प्रमाणे पारनेर तालुक्यातील गावांमध्येही कार्ले यांच्या प्रचाराचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी कार्ले यांनी निघोज व परिसरात दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे दमदार स्वागत केले.

यावेळी कार्ले म्हणाले, मी कोणावर टीका करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. तर जनतेची कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे आपले समाजकारणाला कायम प्राधान्य आहे. गेल्या तीन टर्मपासून पारनेर-नगर मतदारसंघातून विधानसभेची तयारी करत आहे. परंतू यंदा आघाडीच्या जागा वाटपात पारनेरची जागा राष्ट्रवादीला गेली. परंतु, लोकसभेला आपण त्यांना मनापासून मदत केली आहे. आता त्यांनी आपल्याला मदत करण्याची वेळ आहे. नगर तालुक्यातील विकास कामांप्रमाणेच पारनेर तालुक्यातही भरीव विकास कामे करणार आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे. मला आमदार करा पारनेरचा पाणी प्रश्न सोडवून दाखवतो असे ठोस आश्वासन यावेळी कार्ले यांनी दिले.

आम्ही संदेश कार्ले यांच्यासोबत
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख मतदारांची नोंद आहे. त्यातील एक लाखांपेक्षा अधिक मतदार हे नगर तालुक्यातील आहेत. संदेश कार्ले हे गेल्या २० वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. १०० पेक्षा अधिक आंदोलने करुन शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे संदेश कार्ले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते परिचित आहेत. कोणी लहान असो की मोठा ते प्रत्येकाशी आदरानेच ते वागणूक देणार असा त्यांचा स्थायी स्वभाव. नगर तालुक्यात प्रत्येकाला संदेश कार्ले हेच आमदार व्हावे असे वाटते. त्यामुळेच त्यांच्या प्रचारात शेकडो महिला सक्रिय आहेत. नगर तालुक्यातील मतदार आम्ही संदेश कार्ले यांच्यासोबत आहोत असे म्हणत आहेत.

संदेश कार्ले यांनी मिनी आमदारकी उपभोगलीय
नगर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी केलीय. शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याने त्यांच्या पाठिशी शिवसैनिक एकवटला आहे. संदेश कार्ले यांनी नगर तालुका प्रमुख पदाच्या माध्यमातून शिवसेना वाढीचे काम केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ते सदस्य राहिले आहेत. जिल्हा परिषदला मिनी मंत्रालय समजले जात तर पंचायत समितीच्या सभापतीला मिनी आमदार मानले जाते. सभापती पदाच्या काळात संदेश कार्ले यांनी प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविली. त्यामुळे नगर तालुक्यातील प्रत्येक गाव पत्येक वाडीवर संदेश कार्ले पोहोचले आहेत.

संदेश कार्ले सर्वपक्षीय उमेदवार
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमदेवार काशिनाथ दाते, महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके, माजी आमदार विजय औटी, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह इतर अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगर तालुक्यातील आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले संदेश कार्ले हे एकमेव उमेदवार आहेत. सर्वांच्या सुख दुःखात कार्ले सहभागी होत असल्याने नगर तालुक्यातील नागरिक संदेश कार्ले यांना आपला उमेदवार असल्याचे मानत आहेत. तसेच त्यांच्या प्रचारात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होत असल्याने त्यांना सर्वपक्षीय उमेदवार मानले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर…

नाशिक / नगर सह्याद्री - मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही...

राज्यात सत्तांतर होणार; शरद पवार यांनी सांगितले खरे कारण…

पुणे / नगर सह्याद्री – लोकसभा निवडणुकीत पक्षफोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच...

झुंडशाहीला लगाम घालण्यासाठी पुढे या!; काशिनाथ दाते काय म्हणाले पहा…

पारनेरमधील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचे मतदारांना पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याचे आवाहन पारनेर |...

श्रीेगोंद्यात एकाला पैशाची मस्ती अन् दुसर्‍याला टक्केवारीची!; मतदान संपताच बारामतीकडे रवाना होणार!

राहुल जगतापांचा पॅटर्न भावू लागला! कोणता साक्षात्कार झाला म्हणून, महायुतीचं समर्थन करणार्‍या ताई अचानक...