spot_img
अहमदनगरआरोग्य विभागातील 'ते' कपाट सील; कारण काय?

आरोग्य विभागातील ‘ते’ कपाट सील; कारण काय?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेच्या आरोग्य विभागातील औषध खरेदी व वापराबाबत नोंद असलेले रजिस्टर व इतर कागदपत्रे असलेले कपाट त्याची चावी उपलब्ध होईपर्यंत मंगळवारी सील करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजाची सध्या समितीमार्फत चौकशी सुरू असून, या पार्श्वभूमीवर हे कपाट सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाची समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांची समिती ही चौकशी करत आहे. यात औषध खरेदीचीही चौकशी होणार असल्याचे समजते.

औषध खरेदी व वापराबाबतच्या नोंदी असलेले रजिस्टर व कागदपत्रे ज्या कपाटात आहेत, त्याची चावी तत्कालीन फार्मासिस्टकडे आहे. त्या सध्या रजेवर असल्याने कपाटाची चावी मिळेपर्यंत ते कपाट प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले आहे.

दरम्यान, समितीमार्फत चौकशी प्रगतीपथावर आहे. संपूर्ण कामकाजाची चौकशी असल्याने त्याला अवधी लागणार आहे. येत्या आठवडाभरात चौकशीचा अहवाल येण्याची शक्यता असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...