spot_img
ब्रेकिंगबनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढले, पुढे नको तेच घडले!, 'यांना' कारागृहाची हवा..

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढले, पुढे नको तेच घडले!, ‘यांना’ कारागृहाची हवा..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना पाथड तालुक्यातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. सुदर्शन शंकर बडे (वय 32 रा. येळी, ता. पाथड) व सागर भानुदास केकान (वय 29 रा. खेरडे, ता. पाथड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रूग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरली. त्याव्दारे कर्णबधीर असल्याचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला होता. या प्रकरणी जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथड तालुक्यातील सागर भानुदास केकान, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, गणेश रघुनाथ पाखरे यांच्यासह जिल्हा रूग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

तसेच या गुन्ह्यातील तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. मात्र सुदर्शन बडे व सागर केकान हे दोघे पोलिसांना अनेक दिवसांपासून चकवा देत होते. बडे हा त्याच्या येळी येथील घरी आली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला गुरूवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर केकान याला पाथडतील एका मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.–पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. उपनिरीक्षक पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...