spot_img
अहमदनगरमनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

spot_img

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४ मुद्द्यांवर हरकत
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकत, सूचनांच्या शेवटच्या दिवशी शहर ठाकरे शिवसेनेने एकत्रित रित्या विविध चौदा मुद्द्यांवर हरकती नोंदवल्या. पुनर्रचनेत नागरिकांची गैरसोय झाली आहे. केवळ विरोधकांची कोंडी करण्याचा गैर हेतू आहे. शिवसेनेचा पारंपारिक मतदार, बालेकिल्ला असणाऱ्या सर्वच प्रभागांची आक्षेपार्हरित्या मोडतोड केली आहे. विशेषत: सन २०१८ च्या रचनेतील प्रभाग क्रमांक ७, ८, १०, १२, १३, १५, १६ या शिवसेनेच्या सर्वच प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली असल्याचे म्हणत, प्रक्रियेत वारेमाप राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा गंभीर आरोप शहरप्रमुख किरण काळे यांनी केला आहे. प्रारूप रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देखील हरकती सादर करण्यात आल्या आहेत.

ठाकरे सेनेने हरकतींत म्हटले आहे की, विविध तथ्ये, कारणे लक्षात घेता, २०२५ साठीची रचना तात्काळ रदद करा. नव्याने रचना जाहीर करुन हरकत व सुचना मांडण्यासाठी नवीन तारीख जाहीर करा. सन २०१८ व २०२५ या दोन निवडणुकां करिता २०११ च्याच जनगणनेचा आधार घेतला आहे. तरी जुन्या प्रभागांची मोडतोड केली आहे. लोकसंख्या वाढलेली नसताना, कोणताही नवा भाग मनपा हद्दीत समाविष्ट झालेला नसताना देखील प्रभाग रचना पुनर्गठीत करण्यात आली आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. सबब २०१८ च्या रचने प्रमाणेच निवडणूक घ्यावी. प्रभाग रचनेचे कामकाज हे काही सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या खाजगी कार्यालयात बसून मनपा अधिकाऱ्यांनी केले आहे. गोपनीयतेचा भंग झाला आहे.

पुढे म्हटले आहे, मनपाने आपल्या संकेतस्थळावर प्रगणक गटांचे नकाशे, गटनिहाय लोकसंख्या दर्शविणारे परिशिष्ट – ३, ४, प्रभाग निहाय “ब नकाशे” जाणीवपूर्वक प्रसिद्ध केले नाही. यामुळे नागरिक वस्तुस्थिती बाबत अनभिज्ञ आहेत. नकाशांवर आयुक्त, उपायुक्त, नगर रचनाकारांच्या सह्या अनिवार्य असूनही नाहीत. सदर नकाशे हे राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यते शिवाय आयोगाची दिशाभूल करत बेकायदेशीर रित्या जाहीर केल्याचे दिसते आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

ठाकरे सनेने म्हटले आहे, प्र. १७ च्या रचनेत आदेशातील ५.५.२ च्या तरतुदीचे उल्लंघन झाले आहे. रेल्वे रूळ, रेल्वे फ्लाय ओव्हर, नगर – दौंड महामार्ग ओलांडून भौगोलिक सलगता तोडत काही भाग केडगावला जोडला आहे. सन २०१८ प्रमाणे आरक्षण जाहीर केलेले नाही. प्र. १३ ची रचना करताना पुणे – अहिल्यानगर – छत्रपती संभाजी नगर या मार्गावरील उड्डाण पुलाची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे भौगोलिक सलगते अभावी नागरिकांची गैरसोय झाली आहे. प्र. १४ हा शहर लोकप्रतिनिधींचा स्वतःचा प्रभाग आहे. प्र. १ ते १७ मध्ये हाच एकमेव प्रभाग असा आहे की ज्यामध्ये पूर्वाश्रमीचा बहुतांश भाग आहे तसाच ठेवला आहे. राजकीय दबावातून हे करण्यात आले आहे. प्रशासनाने आपण सर्व पक्षांसाठी समान असून नागरिकांच्या व्यापक हितार्थ काम करतो हे दाखवून द्यावे.

पुढे म्हटले आहे, प्र. १ मध्ये सीना नदी ओलांडून नागापूर गावठाणचा समावेश केला आहे. यापूर्वीच्या रचनेत सदर भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पूर्वीच्या प्र. ७ मध्ये समाविष्ट होता. प्र. ५ ची रचना करताना पत्रकार वसाहत चौक ते डीएसपी चौक, नगर – मनमाड रोड, नगर – छत्रपती संभाजीनगर रोड या तीन मुख्य रस्त्यांना ओलांडून, तसेच अनेक मागासवर्गीय वस्त्यांना विभागून प्रभाग रचना करण्यात आली आहे. मागासवर्गीय बांधव, अल्पसंख्यांक समुदाय असणाऱ्या रहिवासी भागांचे अत्यंत नियोजनबद्ध रित्या मार्गदर्शक सूचनांना डावलून द्विभाजन, त्रिभाजन करत टार्गेट केले गेले आहे. राजकीय आकस भावनेतून सत्ताधारी, प्रशासनाने संगनमतातून हे केले असल्याचे ठाकरे शिवसेनेने म्हटले असून यावर हरकती नोंदविल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...