अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा पाहता ते मनपाचे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवत आहेत हे त्यांना पुराव्यानिशी दाखवून द्यायला तयार आहे असे जाहीर आवाहन काळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
किरण काळे त्यांनी उघड केलेल्या स्कॅम आणि तक्रारीनंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगर मधील स्कॅम बद्दल पत्र लिहून पुराव्यांची फाईल पाठवत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनपा आयुक्त डांगे यांनी तात्काळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत खुलासे केले होते. आ. जगताप यांनी देखील राऊत, शिवसेनेवर टीका करत चौकशी झाली असे म्हणत तसा भ्रष्टाचार झालाच नसल्याचे म्हटले आहे. आयुक्त डांगे,आमदार जगताप यांच्या वक्तव्यानंतर शहर शिवसेना आक्रमण झाली असून शहर प्रमुख काळे यांनी पत्रकार परिषद घेत त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना कागदपत्रे दाखवले. आमदार, मनपा अधिकारी, ठेकेदार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी काळे यांनी केली आहे. आयूजि डांगेंनी भ्रष्टाचाऱ्यांची, आमदारांची प्रवक्तेगिरी सुरू केली आहे. शहराची कामे करण्यापेक्षा कलेक्शन एजंट असणाऱ्या राजकीय हस्तक, ठेकेदार यांच्याबरोबर अँटी चेंबरमध्येच त्यांचा सगळा वेळ जातो. भ्रष्टाचारांचा तो अड्डा झाला आहे. ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. भ्रष्टाचारांना मदत करणे हा देखील भ्रष्टाचार असून या घोटाळ्यात आयुक्त डांगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, आरोपी करा अशी मागणी काळे यांनी केली.
डांबर खाल्ले, तोंड काळे केले
भ्रष्टाचार उघड झालेल्या काळामध्ये भाजप व शिंदे गटाचे आत्ताचे पदाधिकारी सत्तेच्या खुचवर होते. त्यांना येथील जनतेने निवडून दिले ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्व. अनिल राठोड यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्यांना निवडून दिले व ते नगरसेवक झाले हे ते विसरले. यांच्याकडे कोणता विश्वास आहे? यांची प्रवृत्ती विटा, वाळू, गोळा करायची आहे. रस्त्यासाठी हे लागत असते तस डांबर ही लागत असत. पण यांनी डांबर सुद्धा खाल्ल आणि आता तेच डांबर तोंडालाही फासल आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख काळे यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केला आहे.