spot_img
ब्रेकिंगआरोग्यात अनियमितता! आयुक्त डांगे यांची नोटीस; कारणे दाखवा..

आरोग्यात अनियमितता! आयुक्त डांगे यांची नोटीस; कारणे दाखवा..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या शासकीय योजनेच्या खात्यातून महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी विजयकुमार रणदिवे यांच्या वैयक्तिक खात्यात 15 लाख रुपयांची रक्कम वर्ग करून ती प्रत्येकी 5 लाख रुपये या प्रमाणे पुन्हा योजनेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आक्षेप चौकशी समितीच्या अहवालात घेण्यात आला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हा प्रकार घडला असून, समितीच्या अहवालात या आक्षेपांसह 11 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यावर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा मागवला आहे.

आयुक्त डांगे यांनी 16 जानेवारी रोजी आरोग्य विभागाच्या कामकाजाची चौकशी उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या समितीमार्फत प्रस्तावित केली होती. 31 जानेवारी रोजी समितीने अहवाल सादर केला असून यानुसार आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात शासकीय निधीच्या खात्यातून 15 लाख रुपये रणदिवे यांच्या वैयक्तिक खात्यावर पाठविण्यात आले व परत खात्यामध्ये वर्ग केल्याने अपहाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, देयकातून शासकीय कपाती व इपीएफमधून कपात केलेल्या रकमा भरणा केलेल्या नाहीत, विविध योजनांचे लेखे व कॅशबुकमध्ये त्रुटी,पीसीपीएनडीटी / बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत परवाने देण्यामध्ये त्रुटी, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधीतून सक्षम प्राधिका-याची मंजुरी न घेता देयके अदा करणे, सेवा हमी कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या सेवांमधील अनियमितता, कार्यालयीन कामकाजाचे नियोजन व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण नसणे, एनयुएचएम व विविध कार्यक्रमांतर्गत कंत्राटी स्वरुपाची रिक्त पदे भरतीमध्ये अनियमितता, वैद्यकिय आरोग्य अधिकारी रँकिंगमधील क्रमवारीत सातत्याने शेवटच्या स्थानाजवळ असणे, औषध खरेदी व औषध साठा नोंदवही तपासणी दरम्यान संबंधित कर्मचारी यांनी कोणताही चार्ज न देता विनामंजुरी दीर्घ रजेवर जाणे, जैवविविध कचरा प्रकल्पातून मिळणा-या रॉयल्टीमधील अनियमितता असे 11 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

या अहवालाच्या आधारावर कार्यालयीन कामकाजावर आपले नियंत्रण दिसुन येत नाही, तसेच आपल्या कामकाजामध्ये सुधारणा झाल्याचे दिसुन आलेले नाही, सदरचे वर्तन कार्यालयीन शिस्तीस सोडुन अत्यंत गैर बेजबाबदारपणाचे आणि कार्यालयीन कामकाजामध्ये अक्षम्य हलगजपणा करणारे व अत्यावश्यक सेवेमध्ये अडथळा निर्माण करणारे आहे, असा ठपका ठेवत आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...