spot_img
ब्रेकिंगIPL 2025 : चॅम्पियन RCB ला मिळालं करोडोंचं बक्षीस, पराभूत पंजाबवरही पैशांचा...

IPL 2025 : चॅम्पियन RCB ला मिळालं करोडोंचं बक्षीस, पराभूत पंजाबवरही पैशांचा पाऊस, कोणाला किती पैसे मिळाले ?

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम –
RCB Prize Money IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर 18 वर्षांची प्रतिक्ष संपवत, आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात आरसीबीनेपंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. आरसीबीचा स्टार खेळाडू असलेल्या विराटने 35 चेंडूत 43 धावांची संथ खेळी खेळली, मात्र तरीही, बंगळुरूने दमदार गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावलं. 18 वर्षांनी ट्रॉफी जिंकल्यामुळे आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूसाठी आणि फॅनसाठी हा विजय खास आहे. विजय समीप आल्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते, तर विजयाच्या इतक्या जवळ येऊनही पराभव पत्करावा लागल्यामुळे पंजाबचे खेळाडू निराश झाले. या विजयासाठी आरसीबीच्या संघाला किती पैसे मिळाले आणि पंजाबल बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली ? सविस्तर जाणून घेऊया.

विजेत्या RCB ला किती पैसै मिळाले ?
आयपीएल 2025 या सीझनचा चॅम्पियन बनल्याबद्दल आरसीबीला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. गेल्या वर्षीही कोलकाता नाईट रायडर्सना एवढीच रक्कम मिळाली होती. एकीकडे बंगळुरूला 20 कोटी रुपये मिळाले असतानाच फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघाला म्हणजेच पंजाब किंग्जवरही पैशांचा पाऊस पडला आहे. उपविजेतेपदासाठी पंजाबला 13 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स देखील रिकाम्या हाताने परतणार नाहीत, त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचल्याबद्दल बरेच पैसे मिळणार आहेत.

आयपीएल 2025 मधील टॉप-4 टीम्सची प्राइज मनी
• विजेता टीम (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर )- 20 कोटी रुपये • उप-विजेता (पंजाब किंग्स)- 13 कोटी रुपये • तिसऱ्या स्थानी असलेली वाली टीम (मुंबई इंडियन्स )- 7 कोटी रुपये • चौथ्या स्थानावरची टीम (गुजरात टायटन्स)- 6.5 कोटी रुपये

यांनाही मिळाले पुरस्कार
• सीझनमध्ये सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)- साई सुदर्शन (७५९ धावा), 10 लाख रुपये
• सीझनमध्ये सर्वाधिक विकेट (पर्पल कॅप)- प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट), 10 लाख रुपये
• इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन- साई सुदर्शन, 10 लाख रुपये
• मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन- सूर्यकुमार यादव, 15 लाख रुपये
• सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन- वैभव सूर्यवंशी, Tata Curv ईवी कार
• सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स- निकोलस पूरन, 10 लाख रुपये
• सीझनमध्ये सर्वाधिक डॉट बॉल- मोहम्मद सिराज, 10 लाख रुपये
• सीझनमधील सर्वोत्तम कॅच- कामिंदु मेंडिस, 10 लाख रुपये
• सीझनमध्ये सर्वाधिक चौकार- मोहम्मद सिराज, 10 लाख रुपये
– साई सुदर्शन, 10 लाख रुपये
• फेअर प्ले अवॉर्ड: चेन्नई सुपर किंग्स• पिच अँड ग्राउंड अवॉर्ड : DDCA (दिल्ली डिस्ट्रिक्ट एंड क्रिकेट एसोसिएशन), 50 लाख रुपये

काल काय घडलं ?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कालच्या फायनल सामन्यात, टॉस हरल्यानंतर पंजाबने बॉलिंग घेत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल. बंगळुरूने प्रथम खेळताना 190 धावांचा मोठा स्कोअर केला. आरसीबीच्या कोणत्याही खेळाडूने अर्धशतक झळकावले नाही हे आश्चर्यकारक होते, तरीही संघ 190 धावांपर्यंत पोहोचू शकला. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्ज संघ 20 षटकांत केवळ 184 धावाच करू शकला. जोश हेझलवूडने 4 षटकांत 54 धावा दिल्या, तो महागडा ठरला, परंतु बंगळुरूच्या गोलंदाजीने कहर केला, त्यांचे विराट कोहलीनेही कौतुक केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...