कर्जत | नगर सह्याद्री:-
कर्जत नगरपंचायतीमध्ये बंडखोर गटनेते संतोष मेहत्रे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध करण्यात आली असून सत्तांतराची प्रक्रिया सोमवारी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या ताब्यातील नगरपंचायत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी खेचून आणली. दरम्यान दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा लोक सोडून जाताहेत याचे त्यांनी आत्मचिंतन करावे असा टोला सभापती शिंदे यांनी आ. रोहित पवार यांना लगावला.
या निवडीनंतर विधान परिषदेचे भाजपचे आमदार तथा सभापती राम शिंदे यांनी13 डिसेंबर 2021ची मधील कृतीची काल 2025मध्ये केलेली पुनरावृत्ती चर्चेत आली. आप समझदार हैं, सब कुछ समझते हो, राम शिंदेंची ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पाट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सूचक इशारा इशारा असल्याची चर्चा कर्जत-जामखेडमध्ये रंगली आहे.
कर्जत नगरपंचायतीध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटाची सत्ता जाऊन भाजपचे राम शिंदे यांची संपूर्ण सत्ता आली. नगरपंचायतीमध्ये संपूर्ण सत्तातंर झाल्यानंतर राम शिंदे यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. राम शिंदे यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगरसेवकांसह बसले होते. त्यांची ही कृती 13 डिसेंबर 2021ची सत्ता संघर्षाची आठवण करून देणारी ठरली. त्यावेळी आणि काल देखील सोमवार होता.
यावेळी सभापती राम शिंदे म्हणाले, की वास्तविक पाहता या नगरसेवकांचा ताळमेळ चालण्यात, त्यांच्यात संवाद ठेवण्यात आणि त्यांना एकत्र ठेवण्यात रोहित पवार अपपशी ठरले. नगरसेवकांनी उठाव केला. लोकशाहीमध्ये बहुमत असूनही अविश्वासाची सत्तूद नव्हती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाने नवीन अध्यादेश जारी केला आणि त्यानुसार अविश्वास दाखल करण्यात आला, असे राम शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, कर्जत नगरपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले. दुस-यांवर टीका करण्यापेक्षा आपल्याला अनेक लोक सोडून जात आहेत, यावर रोहित पवार यांनी आत्मचिंतन करावे, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अजूनही त्यांच्याच निवडून आलेल्या पक्षात आहेत, असा टोलाही राम शिंदे यांनी यावेळी लगावला.