पारनेर । नगर सहयाद्री:-
नारायणगव्हाण ( ता. पारनेर) येथील युवा बुद्धिबळपटू डॉ. ओंकार नानासाहेब शेळके यांनी आंतरराष्ट्रीय यश साकारले. अलेन (यु.ए.ई ) येथे अबुधाबी स्पोईल कौंसिल आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चौथा क्रमांकाचे विजेतेपद पटकाविले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ३१ देशाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
पारनेर तालुक्याचे सुपुत्र डॉ. ओंकार नानासाहेब शेळके यांनी पुण्यातील डी.वाय.पाटील दत महाविद्यालयात (बी.बी.एस) चे शिक्षण घेतले असून गेल्या १५ वर्षांपासून तेबुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे देशपातळीवर तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. डॉ. ओंकार शेळके यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे मिळाली आहे.
डॉ. ओंकार शेळके हे नारायणगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी कै. सोपानराव शेळके यांचे नातु तर सुरभी अग्रो केमिकल्स कंपनीचे वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब सोपानराव शेळके व गृहिणी मंगल नानासाहेब शेळके यांचे चिरंजीव आहे. डॉ. ओंकार शेळके यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.