नगर सह्याद्री वेब टीम
Kareena Kapoor | अभिनेत्री करीना कपूरचा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पती सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूर चांगलीच चर्चेत आली होती. या कठिण प्रसंगात ती खंबीरपणे सैफच्या पाठीशी उभी राहिली. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
करिनाच्या आत्याचा मुलगा अदर जैन विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असून याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय पोस्टमध्ये तिने लिहिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. “अंधारानंतर प्रकाश हा नक्कीच येतो. त्यामुळे नकारात्मकता सोडा आणि आनंदाचा स्वीकार करा. माझ्या जवळच्या लोकांसोबत प्रेम, आनंदाचे क्षण साजरे करत आहे. प्रेम कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त असतं.” अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
दरम्यान, अभिनेता आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर १२ जानेवारी २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला. गोव्यात आदर व अलेखा यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. आता पुन्हा ते हिंदू रितीरिवाजानूसार लग्न करणार आहेत. अलीकडेच आदर जैनचा मेहंदी सोहळा पार पडला या सोहळ्याला करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.