spot_img
महाराष्ट्रआंतरजिल्हा कॉपर चोरी टोळी जेरबंद; पोलिसांनी 'असा' लावला सापळा..

आंतरजिल्हा कॉपर चोरी टोळी जेरबंद; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर व सोलापुर जिल्ह्यात कॉपर चोरीच्या मालिकेमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईत तब्बल आठ गुन्ह्यांचा छडा लागला असून 3 लाख 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी महादेव रंगनाथ पवार (48, अकलुज, जि. सोलापुर),दादा लाला काळे (19, सवतगाव, ता. माळशिरस, जि. सोलापुर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सखोलचौकशी केली असता आणखी सहा साथीदारांची नावे कबूल केली असून त्यातील पाच जण फरार आहेत. रामा लंग्या काळे, महादेव बाबु काळे (दोघे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव), दिलीप मोहन पवार, सुरेश नामु काळे, सुरेश नामदेव चव्हाण (तिघे रा. सवतगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर) अशी फरार आरापींची नावे आहेत

आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. दिनांक 15 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील राशिन येथे झालेल्या कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासातून या टोळीचा माग काढण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग आठ दिवस तपास करून ही टोळी उघडकीस आणली. या टोळीने केवळ अहिल्यानगरच नव्हे तर सोलापुरातील अकलु, पंढरपूर, माळशिरस, करमाळा आणि वैराग येथेही चोरी केल्याचे उघड झाले आहे. कर्जत व अकलुज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसह एकूण आठ गुन्हे उघड झाले आहेत.

मुख्य आरोपी महादेव पवार हा पूवपासूनच रेकॉर्डवरील असून सोलापुर, सातारा, रायगड, पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दरोडे, घरफोड्या व चोरीचे तब्बल 13 गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूमिका बजावली. पथकात पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचा समावेश होता. पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांपासून ते अनेक...

महाराष्ट्रात अस्मानी संकट, फडणवीसांचा दिल्ली दौरा, पंतप्रधानांचे मोठे आश्वासन?

नवी दिल्ली / नगर सह्याद्री - राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झाला...

मोहटा देवी यात्रा; विखेंचा लंकेंना टोला! काय म्हणाले पहा…

पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात: सुजय विखे...

केडगावमध्ये भाईगिरीचा थरार!, तरुणावर धारदार शस्राने वार, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव परिसरात दोन दिवसांपूव झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याच्या रागातून...