spot_img
अहमदनगरचिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

spot_img

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत असल्याने शेजारील सात एकर जागेत कांदा शेड बनवत आहोत. चिचोंडी पाटील येथे ही उपबाजार सुरू करणार असून त्याचे भूमिपूजन 14 सप्टेंबरला करणार आहोत. ज्या ठिकाणी कांदा जास्त पिकतो अशा भागात जागा घेऊन त्या ठिकाणी ही कांदा मार्केट सुरू करण्याचा मानस आहे. भविष्यामध्ये मार्केटला जागा कमी पडणार आहे. चिचोंडीला त्यादृष्टीने नियोजन चालू असल्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. नेप्ती उपबाजार वाढीसाठी माजी सभापती भानुदास कोतकर तसेच स्वर्गवासी अरुणकाका जगताप यांचेही मोलाचे योगदान मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील सात एकर जागेतील कांदा शेडचे भूमिपूजन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेप्ती कांदा मार्केटचे शिल्पकार, माजी सभापती भानुदास कोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, व्हाईस चेअरमन रभाजी सूळ, उदयनराजे कोतकर, दादाभाऊ चितळकर, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, राम साबळे, अरुण होळकर, विठ्ठल जपकर, अशोक झरेकर, देवा होले, नारायण आव्हाड, दादा दरेकर, हरिभाऊ कर्डिले, सुधीर भापकर, संजय गिरवले, धर्मनाथ आव्हाड, रामदास सोनवणे, भाऊ भोर, मंजाबापू घोरपडे, संजय निमसे, मधुकर मगर, भाऊसाहेब ठोंबे, राजू आंबेकर, अभय घिगे, रामदास आंधळे आदींसह शेतकरी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार कर्डिले म्हणाले, ज्यावेळेस नेप्ती बाजारची जागा घेतली होती. त्यावेळेस ही जागा अगदी शहरा बाहेर होती. आज ती हायवेमुळे शहरात आली आहे. आता ही जागा ही अपुरी पडत आहे. त्यासाठी आता पुन्हा शेजारील सात एकर जागेत आपण शेड बनवत असून त्यापैकी तीन एकर जागा पार्किंगसाठी आहे. उर्वरित चार एकर जागेमध्ये सात हजार स्क्वेअर फुटाचे कांदा लिलाव शेड असणार आहे. शेडमध्ये पहिल्या मजल्यावर 36 गाळे ऑफिस साठी तयार करणार आहोत. शेड भोवती भोवती 15 ते 20 मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, कंपाउंड, विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृह करणार आहोत. हा सर्व एकूण प्रोजेक्ट 26 कोटीचा आहे. पैकी 13 कोटी 72 लाखाचे शेड आहे. शेडसाठी पणन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कर्ज प्रस्ताव दाखल केला आहे. उर्वरित खर्च बाजार समिती स्वनिधी, बँक, व सबसिडी मार्फत उभा करणार आहोत.

उदयनराजे कोतकर यांचे जंगी स्वागत
नेप्ती उपबाजार समितीमध्ये शनिवारी सात एकर जागेत कांदा शेडचे भूमिपूजन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर संदीप कोतकर यांचे चिरंजीव युवा नेते उदयनराजे कोतकर यांचे फटाके वाजून जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, आमदार कर्डिले यांनी आपल्या भाषणात उदयनराजे हा माझा नातू आहे. त्याने माझ्या आजारपणात जास्त काळजी घेतल्याचे आवर्जुन सांगितले. बाजार समितीच्या कार्यक्रमात उदयनराजे संदीप कोतकर यांचे जंगी स्वागत झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

श्रीरामपूरच्या रस्त्यावर थरार; भरदुपारी गोळीबार; आमदार ओगले म्हणाले, पोलीस सामील..

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गिरमे चौकात भरदुपारी घडलेल्या गोळीबारामुळे शहरात...