अहिल्यानगर सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. हिंदू जागा झाला असून त्यांनी लोकसभेची चूक दुरुस्त केली. विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू एकवटला आणि हिरव्या गुलालाऐवजी भगवा गुलाल उधळला. राजाभाऊ पोतदार यांनी ब्राह्मण समाज एकसंध करण्याचे काम केले आहे. हभप मंदार बुवा रामदासी यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना माझ्यासाठी व हिंदुत्वासाठी त्यांनी काम केले आहे. शहरामध्ये आध्यात्मिकता वाढीसाठी काम केले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणूक सुरू होण्याअगोदरच ब्राह्मण समाजाने मेळावा घेऊन सर्वात प्रथम पाठिंबा दिला आणि माझा प्रचार देखील केला आहे. शहराच्या विकास कामाबरोबरच हिंदुत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरात श्री भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर उभे राहत असल्यामुळे वर्षभरात फोटोचे रूपांतर मूर्तीमध्ये होणार आहे. निवडणुका येत असतात आणि जात असतात. त्यामुळे काही लोक फक्त जत्रेतल्या पाहुण्यासारखे येतात आणि जातात; मात्र आम्ही पाचही वर्षे समाजामध्ये काम करीत असतो. नगरकर हुशार असून त्यांनी देखील काम करणार्यालाच संधी दिली आहे, असेही आमदार जगताप म्हणाले.?सकल ब्राह्मण समाज महासंघ अहिल्यानगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप तिसर्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधियाने विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हभप मंदार बुवा रामदासी, संघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, दत्तोपंत पाठक गुरू, डॉ. एस. व्ही. जोशी, सुधीर भापकर, हभप प्रभाताई भोंग, सुरेश क्षीरसागर, एन. डी. कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, नंदकुमार पोळ, अभिनेते मोहिनीराज गटणे, राजाभाऊ आडकर, राजेश भालेराव, विलास देशमुख, प्रियाताई जानवे, वंदना पंडित, श्याम रेणावीकर, मोरेश्वर मुळे, कालिंदी केसकर, चेतन वसगढेकर, विजय देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, किरण वैकर, मंगेश निसळ, दी. ना. जोशी, योगेश दाणी, सुवर्णा महापुरुष आदींसह मोठ्या संख्येने अन्य ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.राजाभाऊ पोतदार म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचा जल्लोष ब्राह्मण समाजाने केला आहे. आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. कारण माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच सामाजिक कार्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे.
शहरांमध्ये श्री भगवान परशुराम यांचे मंदिर उभे राहावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले व आम्हाला जागा दिली.एन. डी. कुलकर्णी म्हणाले, की आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे की एकही सभा न घेता निवडणूक जिंकली. व्यक्तिगत संपर्क मोठा असल्यामुळे पक्षीय राजकारणापेक्षा आमदार संग्राम जगताप यांच्या कामाला लोकांनी मते दिली.