spot_img
देशपीएम किसान योजनेचा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; ‘हे’ काम करा, अन्यथा...

पीएम किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार; ‘हे’ काम करा, अन्यथा…

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत गरजू शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेंतर्गत 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. तर 19व्या हप्त्याची तारीख देखील समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 फेब्रुवारीला या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. येथूनच देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता जारी केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत माहिती दिली होती. याआधी 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून जारी करण्यात आला होता.

ई-केवायसी गरजेचे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतः ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ई-केवायसी करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
होम पेजवरील Farmers Corner सेक्शनमध्ये जाऊन eKYC पर्याय निवडा.
आता eKYC पेजवर जाऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
आधार क्रमांक टाकल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाका
मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या आधारला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल.
OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
सबमिट करताच तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...