spot_img
ब्रेकिंगसराईत गुन्हेगार 'बिरजू' अडकला पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्ट्यासह आणखी काय गवसलं..

सराईत गुन्हेगार ‘बिरजू’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्ट्यासह आणखी काय गवसलं..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:
गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. बिरजू राजू जाधव (वय २९, रा. पाटील हॉस्पीटलमागे, कोठी, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांना एक इसम गावठी कट्ट्यासह क्लेरा ब्रुस मैदानावर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तेथे जाऊन गावठी कट्टा व तीन काडतुसे बाळगणाऱ्या बिरजू याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले आहेत. पोकॉ सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई कृष्णकुमार सेदवाड करीत आहेत. दरम्यान, बिरजू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...