टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारीत एमआयडीसीची गरज
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पारनेर मतदारसंघामध्ये सुपा एमआयडीसी अतिशय चांगल्या पद्धतीने उभी आहे. मोठे उद्योग तेथे आले आहे. परंतु स्थानिक नागरीकांना हक्काच्या एमआयडीसीत डावलले जात आहे. सुपा एमआयडीसीत शासनाचे स्थानिकांना रोजगार मिळण्याचे धोरण पाळले जात नाही. त्यामुळे स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी शासनाने योग्य पाऊले उचलावीत. पारनेर तालुक्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी सरकारने भाळवणी टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारीत एमआयडीसी देण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली आहे.
अर्थसंकल्पातील मागण्यावरील मुद्दयावर आमदार काशिनाथ दाते विधानसभेच्या सभागृहात बोलत होते. आ. दाते म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे. आणि आता त्याचा विस्तार सहाशे एकरामध्ये होत आहे. भविष्यात औद्योगिक वसाहतीचा विस्तार होत असतांना पारनेर मतदार संघाचा विचार केला गेला पाहिजे. पारनेर तालुका अतिशय दुष्काळी मतदार संघ आहे. कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नाही. पाउस पडला तरच पिके घेता येतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील नगर- कल्याण रस्त्यावरील टाकळी ढोकेश्वर, भावळणी येथे नव्याने एमआयडीसी दिल्यास युवकांना हक्काचा रोजगार मिळेल, अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली आहे.
कान्हूर पठार शाळा प्रकरणात आमदार दाते यांनी घातले लक्ष
रयत शिक्षण संस्थेच्या कान्हूर पठार येथील शाळेत शिक्षक साहेबराव जऱ्हाड याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हे प्रकरण उघडकीय येताच आणि संबंधित शिक्षकावर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच जऱ्हाड या शिक्षकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शाळेची प्रतिमा मलिन झाली असल्याने या प्रकरणात आता पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी लक्ष घातले असून याबाबत रयत शिक्षण संस्थेच्या वरिष्ठांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती आहे.
स्थानिकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार
पारनेर मतदार संघात मुख्यमंत्री यांचा महत्वाकांशी असणारा सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे. प्रकल्पासाठी 500 एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. परंतु उभारणी करणाऱ्या कंपन्या स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे शासनाने योग्य सूचना देत प्रकल्पाचा प्रसार होण्याची गरज आहे.
रेशकार्ड ऑनलाईन करण्याच उधिष्ठ वाढवा
शासनाचे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे उधिष्ठ संपलेले आहे. पारनेर तालुक्यातील अनेक लाभाथ शासनाच्या या योजनेपासून वंचीत राहत आहेत. त्यामुळे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे उधिष्ठ वाढवण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी विधानसभेत केली.
वाड्या वस्त्या मुख्य रस्त्याला जोडण्याची आवश्यकता
पारनेर मतदार संघात 300 लोकसंखेच्या अनेक छोट्या वाड्या वस्त्या आहे. मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या वाड्या वस्त्या मुख्य रस्त्याला जोडण्याची गरज आहे. दरवष 100 किलोमीटरचा कोठा देण्यात यावा. तसेच ग्रामीण रस्त्याची, जिल्हा मार्गची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे त्या रस्त्यासाठी निधी मिळण्याची गरज असल्याचे आ. दाते म्हणाले.