spot_img
अहमदनगरइंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; 'या' हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

spot_img

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या या बालकांना दिले गेलेले Butox इंजेक्शन मृत्यूचे कारण असू शकते, अशी प्राथमिक शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला रिपोर्ट सादर करण्यात आला असून, संपूर्ण बॅच महाराष्ट्रातून मागवण्यात आली आहे. सदरचा प्रकार जळगाव शहरातील प्रसिद्ध जावळे हॉस्पिटलमध्ये घडला. या प्रकरणानंतर पालकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जळगावमधील अडीच वर्षांचा आणि तीन वर्षांचा असे दोन बालक सेरेब्रल पाल्सीवर उपचार घेण्यासाठी जावळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. दोघांनाही एकाच प्रकारचं Butox इंजेक्शन देण्यात आलं. चार तासांच्या आत दोघांच्याही प्रकृतीत गंभीर बिघाड झाला. यानंतर 18 एप्रिल रोजी पहिल्या बालकाचा मृत्यू रुग्णवाहिकेत झाला. 20 एप्रिल रोजी दुसऱ्या बालकाचा मृत्यू दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना झाला. जावळे हॉस्पिटलचे संचालक

डॉ. हर्षल जावळे यांनी सांगितले की, “दोन्ही बालकांना Butox इंजेक्शनच देण्यात आलं होतं. संबंधित बॅचमध्ये काही दोष असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण बॅच राज्यभरातून मागवली आहे. तसेच, जर आमच्या बाजूने कोणतीही चूक आढळली, तर कायदेशीर कारवाईस सामोरे जाऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की Butox इंजेक्शन व्यतिरिक्त इतर औषधांनाही साइड इफेक्ट्स शक्य असल्याने संपूर्ण तपास सुरू आहे. दरम्यान, मृत बालकांच्या पालकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी “तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल” असं सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...