अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने आक्रमक कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी दिवसभरात महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालयाने नगर मनमाड रस्त्यावरील व बालिकाश्रम रस्त्यावरील मालमत्ता थकबाकी पोटी सील केली आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत कराचा भरणा करून जप्तीसारखी कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

उपायुक्त प्रियंका शिंदे यांच्या उपस्थितीत सावेडी प्रभाग अधिकारी बबनराव काळे, कर संकलन अधिकारी विनायकराव जोशी, कर निरीक्षक ऋषिकेश लखापती, तसेच वसुली लिपिक संजय तायडे, संदीप कोलते, राजेश आनंद, सागर जाधव, किशोर देठे, शंकर अवघडे, गोरक्ष ठुबे यांच्या पथकाने मार्क स्केवर अपार्टमेंट येथील तिसरा मजल्यावर असलेले झेड के बॉलीवूड कॅफे ४ लाख २ हजार ७६२ रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आले आहे.
भिंगारदिवे मळा, बालिकाश्रम रोड येथील मालमत्ताधारक भागवत यांचा गणपतीचा कारखाना २ लाख ३० हजार १९७ रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आला आहे. सिव्हिल हडको येथील मालमत्ताधारक शांतीलाल दत्तात्रय औटी यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कराच्या २ लाख ५१ हजार ८७९ रुपयांच्या थकबाकी पोटी महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई सुरू करताच त्यांनी आठवड्याभरात संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली.
तसेच, मालमत्ताधारक लिलाबाई धोंडीराम राठोड यांच्या संभाजीनगर रोडवरील हॉटेल मातोश्रीची मालमत्ता करायची थकबाकी १ लाख ४३ हजार ४७२ रुपये असल्याने त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यांनीही आठवडाभरात संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवल्याने त्यांच्यावरील कारवाई स्थगित करण्यात आली. ज्या मालमत्ताधारकाकडे मालमत्ता कराची थकबाकी असेल, त्यांनी स्वतः येऊन मनपात जमा करावी, अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.