Operation Sindoor: भारताने बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. दरम्यान , या प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत दोन मोठे दहशहतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर – ए-तैयब्बाचे दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात मुरीदके येथील मरकज तैयबावरील हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा एचव्हीटी (हाय व्हॅल्यू टेररिस्ट) अब्दुल मलिक आणि मुदस्सीर मारले गेले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार हल्ले करण्यात आले आहेत . या हल्ल्यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत भारतीय सैन्य , नौदल आणि हवाई दलाचने संयुक्तपणे कारवाई केली.