spot_img
अहमदनगरभारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार! मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला...

भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार! मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला विश्वास, पहा काय म्हणाले..

spot_img

Radhakrishna Vikhe Patil: भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीम इंडियाचे कौतुक केले असून भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभेची जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे महसूलमंत्री विखे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुधाला पाच रुपये अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. दुधाच्या भुकटीची निर्यात थांबल्याने काही अडचणी आहेत. दूध भुकटीच्या निर्यातीला काही प्रोत्साहन देता येईल का? यावर विचार केला जात असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, भारताने विश्वकप जिंकला हा सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारतीय संघाचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे अभिनंदन करतो. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक त्याच ताकदीने जिंकणार असल्याचे सांगत त्यांनी अगामी विधानसभा निवडणुकीबाबत विश्वास व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...