spot_img
देशभारत पुन्हा चॅम्पियन; 12 वर्षांनंतर रचला इतिहास!

भारत पुन्हा चॅम्पियन; 12 वर्षांनंतर रचला इतिहास!

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे. यापूव 2024 मध्ये टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने 12 वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 252 धावांचे लक्ष्य 49 षटकांत 6 विकेट्स गमावून पूर्ण केले. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 76 धावांचे योगदान दिले.

ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूव, संघाने 1983 आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक, 2007 आणि 2024 चा टी-20 विश्वचषक आणि 2002, 2013 आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या जेतेपदाच्या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा करण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली, या अंतिम सामन्यात टीम इंडियाला कर्णधार रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि त्याची त्यांना गरज होती. संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आली नव्हती. मात्र, त्याने अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावून सर्वांची मनं जिंकली.

रोहितने 83 चेंडूत सात चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर शुबमन गिल (31) सोबत शतकी भागीदारी केली. परंतु, त्यानंतर भारताला दोन मोठे धक्के बसले. शुबमन गिलनंतर विराट कोहली (1) देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. लवकरच कर्णधार रोहितनेही आपली विकेट गमावली. त्यानंतर, श्रेयस अय्यर (48) आणि अक्षर पटेल यांनी 61 धावा जोडून संघाचे सामन्यात पुनरागमन केले. श्रेयस अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेल (29) देखील लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुल (नाबाद 34) आणि हार्दिक पंड्या यांनी संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. हार्दिक विजयापूवच (18) बाद झाला. पण केएल राहुलने (34) रवींद्र जडेजासह (9) संघाला जेतेपद मिळवून दिल्यानतंर सुटकेचा नि:श्वास सोडला.

भारताचा फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे
तत्पूव न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार लागले. तर डॅरिल मिशेलने 101 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. भारताकडून वरुण चक्रवत आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जिथे वरुण चक्रवतने 10 षटकांत 45 धावा दिल्या आणि कुलदीप यादवने 10 षटकांत 40 धावा दिल्या. तर हार्दिक पंड्याने 3 षटकांत 30 धावा दिल्या आणि मोहम्मद शमीने 9 षटकांत 74 धावा दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...