Politics News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवर हल्लाबोल करत इंडिया आघाडीलावर देखील बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी एकवटले आहेत कारण त्यांना कुटुंबाचं भलं करायचं असून इंडिया आघाडी संत्र्याप्रमाणे आहे. संत्र्याचे फळ वरुन एकत्र दिसतं मात्र त्याची साल काढली की वेगळ होत असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
राज्यात भाजपा आणि शिवसेना युती तुटल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. अगामी लोकसभेच्या पाश्वभूमीवर सर्वच पक्षानी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेमकं म्हणाले काय?
उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी हे सगळेजण आज एकवटले आहेत कारण यांना कुटुंबाचं भलं करायचं आहे. इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या कुटुंबाचं भलं करायचं आहे. इंडिया आघाडीकडे संत्र्याप्रमाणे आहे. संत्र हे फळ वरुन दिसताना एकत्र दिसतं त्याची साल काढली की आपसुक त्याच्या फोडी वेगळ्या होतात. २०२४ चा निकाल लागला की हे लोक पळून जातील. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल. राहुल गांधी आमचे नेते नसते तर आम्ही जिंकलो असतो असंही हे म्हणतील. अशी बोचरी टीका अमित शाह यांनी केली आहे.