spot_img
अहमदनगरपाणीपट्टीत वाढ, १ एप्रिलपासून किती होणार वाढ पहा...

पाणीपट्टीत वाढ, १ एप्रिलपासून किती होणार वाढ पहा…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
तब्बल २२ वर्षानंतर महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत ९०० ते ४००० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. महासभेत प्रशासक यशवंत डांगे यांनी या दरवाढीला मान्यता देतानाच यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षात २०० रुपयांची वाढ करण्याचा ठरावही करण्यात आला आहे. सन २०२५-२०२६ म्हणजेच नव्या आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून ही करवाढ लागू होणार आहे. त्यामुळे नळ धारकांना अर्धा इंचीसाठी २ हजार ४००, पाऊण इंचीसाठी ४ हजार ८००, तर १ इंचीसाठी १० हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे.

सन २००३ मध्ये अर्धा इंचीसाठी असलेल्या ८०६ रुपये दरात वाढ करून १ हजार ५०० रुपये पाणीपट्टी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सन २०१६ मध्ये केवळ व्यावसायिक व औद्योगिक वापराच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली. घरगुती पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव सन २०१८ पासून सातत्याने फेटाळण्यात आला. प्रशासक नियुक्तीनंतरही निवडणुका असल्याने हा विषय टाळण्यात आला. तब्बल २२ वर्षे पाणीपट्टी वाढली नसली, तरी दुसरीकडे पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्थेवर होणार खर्च वर्षाकाठी सुमारे ४० कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे स्थायी समितीने घरगुती पाणीपट्टीत दुपटीने वाढ सुचवली होती. त्याला विरोध सुरू झाल्यानंतर प्रशासक डांगे यांनी ३००० ऐवजी २४०० रुपये दर निश्चित केला आहे. शहरातील नळधारकांना मीटरद्वारे १० रुपये प्रति हजार लिटरने दर निश्चित करण्यात आला असून यात दरवर्षी २ रुपये दर वाढणार आहे. दरम्यान, हद्दीबाहेर अर्धा इंचीसाठी ४ हजार ८०० रुपये व मीटरद्वारे २० रुपये प्रति हजार लिटर दर निश्चित करण्यात आला आहे. त्यात दरवर्षी २०० रुपये व मीटरद्वारे दरवर्षी ५ रुपये प्रति हजार लिटर दर वाढवण्यात येणार आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर नराधमाला जन्मठेप; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार!

जामखेड । नगर सहयाद्री:- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी...

माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात?; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, आदेशाची प्रत..

Maharashtra Politics News: सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली होती....

धक्कादायक! दिराने वहिनीला संपवल! दारुच्या नशेत असं काय घडलं..

Maharashtra Crime: मावस दिराने दारूच्या नशेत वहिनीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

भीषण! वाळूचा टिप्परने घेतला पाच जणांचा जीव; कुठे घडली घटना?

Maharashtra Crime : पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू झाला आहे....