spot_img
अहमदनगरमाजी नगराध्यक्ष विजय औटीच्या अडचणीत वाढ! पुन्हा एक गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण...

माजी नगराध्यक्ष विजय औटीच्या अडचणीत वाढ! पुन्हा एक गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? पहा..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी पारनेर नगरपंचायतच्या रजिस्टरला ३५ दुकाने व २५ फ्लॅटची खोटी नोंद लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.३) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी १२ जूनला पारनेरच्या पोलिस निरीक्षकांना यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी रात्री उशिरा कार्यालयीन अधीक्षक माधव मारुती गाजरे यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार विजय सदाशिव औटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला .त्यामुळे विजय औटीसह इतरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

२८ नोव्हेंबर २०२३ रोजी पारनेर येथील भैरवी/साई अपार्टमेंटमधील मिळकतीची पाहणी करण्याबाबत मुख्याधिकारी यांच्या आदेशाचे पत्र २३ नोव्हेंबरला तत्कालीन सहायक कर निरीक्षकांना मिळाले होते. त्यानुसार, मुख्याधिकारी विनय शिपाई, लिपीक छबन रघुनाथ औटी, लिपीक राजेंद्र भाऊसाहेब पठारे, सहाय्यक कर निरीक्षक लिंबाजी रामभाऊ कोकरे, रचना सहाय्यक पंकज मेहेत्रे, माधव गाजरे आदींनी भैरवी अपार्टमेंटची प्रत्यक्ष पाहणी केली. भैरवी अपार्टमेंट गट नंबर ३५४१/१, ३५४२ मधील मिळकत नंबर २५९८ बि-विंगमध्ये एकूण ४८ शॉप व २४ फ्लॅट आहेत.

नगरपंचायतीच्या रजिस्टर नोंदीप्रमाणे ही इमारत अस्तिवात आहे. परंतु, पारनेर गावच्या मिळकत गट नंबर ३५४४/१, ३५४०/१, ३५४४/२ व नगरपंचायत मिळकत नंबर २५९४, २५९५, २५९६ च्या रजिस्टरनुसार पाहणी केली असता, या मिळकतीमध्ये भैरवी अपार्टमेंट किंवा इतर नावाने कुठलीही इमारत अस्तित्वात नाही. सदरची जागा मोकळी दिसत आहे. त्यानुसार पाहणी अहवाल २८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्याधिकाऱ्यांना सादर केला.

चौकशीअंती भैरवी अपार्टमेंट अस्तित्वात नसतानाही, नगरपंचायत मागणी रजिस्टर तथा नमुना नंबर ८ वर ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदा नोंद लावून सातबारा उताऱ्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. त्यातून नगरपंचायत प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. मालमत्ता अस्तित्वात नसतानाही कागदपत्र सादर करून फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पोलिस निरीक्षकांना पाठविण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...