अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, महाराष्ट्राच्या मातीत गाडू..अशा प्रकारचे वक्तव्य करून सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.
अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उच्च मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते.
भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली असून याप्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे.
वाचाळ व्यक्तीला लगाम घालण्याची विनंती
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे पुन्हा दिसून आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संजय राऊत यांनी निंदनीय व्यक्त केले आहे. याविरोधात कुंडलिंक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करणार आहे. या वाचाळ व्यक्तीला लगाम घालण्याची विनंती करणार आहोत.
– प्रमोद राठोड ( प्रदेश प्रवक्ते,भाजपा)
अशा विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ
संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उच्च मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते. अशा विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते.
-शिवराय कुळकर्णी ( प्रदेश प्रवक्ते,भाजपा)