spot_img
अहमदनगरमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; पुन्हा नवं काय घडलं?

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; पुन्हा नवं काय घडलं?

spot_img

Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या आरोपांना सामोरे जाणारे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयातदाद मागितली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा त्यांनी आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप देखील करुणा शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्मांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करुणा मुंडे यांचा फॉर्म 30-10-2024 ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता. त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालीय ती करप्ट प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे. त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून, तिचा कुठे उल्लेख केलेला नाही.

तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नाही. ही सगळी माहिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठली माहिती लपवून ठेवली तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्याला पुराव्याची गरज नाही. कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत असे करुणा शर्मा यांच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडून या सर्व प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीला धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात महाविकास आघाडीला गुरुवारी धक्का...

…’ते’ वादाच्या दिशेने जात आहेत; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका

Manoj Jarange Patil: चिल्लर चाळे करायला लागल्याने धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात...

कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम लागला; आमदार संग्राम जगताप यांनी घेतला विरोधकांचा समाचार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगरच्या इतिहासात गणपती विसर्जन मिरवणुकीत आत्तापर्यंत कधीच कव्वाली वाजविली गेली नाही....

राज्यात पुन्हा वाढणार हुडहुडी! येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | नगर सह्याद्री:- उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम देशभरात होत असल्याचे पाहायला मिळत...