spot_img
अहमदनगरभिंगार कॅन्टोन्मेंटला अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करा, खा. विखेंची अधिवेशनात मागणी

भिंगार कॅन्टोन्मेंटला अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करा, खा. विखेंची अधिवेशनात मागणी

spot_img

नगर सह्याद्री / दिल्ली

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत व्हावा याबाबतची मागणी खासदार सुजय विखे यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

भिंगारमधील नागरिकांना मोठ्या समस्येने सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून भिंगारकरांची मागणी आहे की अहमदनगर महापालिकेत भिंगारचा समावेश करावा. याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे.

यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करता भिंगार कॅन्टोन्मेंटला येत्या तीन महिन्यात अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी यावेळी खासदार सुजय विखे यांनी केली आहे. संसदेत बोलताना विखे म्हणाले, माझ्या लोकसभा मतदार संघामध्ये भिंगार छावणी परिषदेची 1879 मध्ये स्थापना झाली.

आजवर 25 हजार लोक याठिकाणी वास्तव्यास आहे मात्र, कॅन्टोन्मेंट भाग हा लष्कराच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बांधकाम असो, नागरी समस्या असो अशा अनेक अडचणी नागरिकांना येत आहे.

यामुळे भिंगारचा समावेश नगर महानगरपालिकेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी एक महत्वाची बैठक पार पडली आहे. तसेच भिंगारचे नागरिक यांचे मत जाणून घेण्यासाठी एक नगरमध्ये बैठक देखील पार पडली. यामध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून येत्या काळात लवकरात लवकर भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश अहमदनगर महापालिकेत करण्यात यावा अशी मागणी यावेळी खासदार सुजय विखे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

सुमारे 1879 मध्ये स्थापन झालेल्या भिंगार छावणी परिषदेचे लष्करी क्षेत्र वगळून, नागरी क्षेत्र हे अहमदनगर महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सध्या भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप हे चांगलेच आग्रही आहे.

यातच येत्या चार महिन्यात याबाबतचा निर्णय होईल अशी ग्वाही देखील खासदार विखेंनी भिंगारकरांना दिली होती. दरम्यान याच प्रश्नी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विखे यांनी पुन्हा एकदा भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश लवकरात लवकर नगर मनपामध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...