अहमदनगर। नगर सहयाद्री-
अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिहासनारुढ पुतळा बसवला जाणार आहे. हा लोकार्पण सोहळा २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता होणार आहे. लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे, पदाधिकारी, व सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.
पुतळ्याचे अनावरण जरांगे पाटील यांच्या हस्ते व्हावे
महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करावे अशी मागणी नगरसेविका शीला दीप चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त व महापौर यांना दिले. पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल असे त्यांनी म्हटले आहे.