निघोज। नगर सहयाद्री-
पारनेर तालुयातील मुंबई स्थायिक जनतेने मुंबईत राहून नगर जिल्ह्याचा नावलौकिक मोठा केला असून बदलापूर येथील अनिकेत थोपटे या युवकाने मोहर या चित्रपट माध्यमातून मोठे काम केले असून यामुळे पारनेरचा नावलौकिक राज्यात होणार असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री व शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोहर या चित्रपटाचे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते पारनेरचे सूपुत्र अनिकेत थोपटे व सहकलाकार यांच्या मोहर या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या या सहा कलाकारांच्या कलेचे प्रदर्शन हे गुरुशिष्य परंपरेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
दि.२१ ते २७ मे रोजी चालणार्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार सचिन आहेर, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, हिरल ढोलकिया, कला दिग्दर्शक दिगंबर तळेकर, दत्तात्रेय देसाई हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
अनिकेत थोपटे, सायली कोठेकर, सीताराम राऊळ, कविता दुडी, स्वरूप पाताडे, ओमकार अरोस्कर या कलाकारांनी आयोजित केलेल्या मोहर ह्या चित्रप्रदर्शनात निसर्ग, बालपण, अध्यात्म, वन्यजीवन इ. वेगवेगळ्या विषयांवरील, चित्रे मांडली असून हा कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून यांच्याकडे पाहिले जात आहे.
ठाकरे यावेळी म्हणाले अनिकेत थोपटे व सुरेश भोसले यांनी मुंबईत राहून चित्रकला क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. पारनेरचा नावलौकिक राज्यात करण्यासाठी थोपटे व भोसले यांचे मोठे योगदान आहे. पारनेर हा गुणवंतांचा तालुका आहे.
गेली अनेक वर्षांपासून तालुयातील गुणवंत लोकांचा आपल्याशी मोठा संपर्क आहे. सातत्याने प्रत्येक कार्यक्रमात आपण उपस्थित राहून गुणवंताचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले हा आमचा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांनी केले.