spot_img
अहमदनगरनगरमध्ये दोन गटात राडा, घडलं भयंकर...

नगरमध्ये दोन गटात राडा, घडलं भयंकर…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सेफ्टी टँकचा खड्डा खांदल्याच्या कारणावरून नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात दोन गटात चाकू, दगड, लाकडी दांडक्याने हाणमारी झाल्याची घटना घडली. मारहाणीत चौघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शोभा बबन कातोरे (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद नामदेव कातोरे, राजेंद्र नारायण लाळगे, सविता शरद कातोरे, श्रवण शरद कातोरे, विजय नारायण लाळगे, अनिता विजय लाळगे, सुनीता राजेंद्र लाळगे (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा कातोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शनिवारी (02 नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित आरोपी यांना आमच्या घराच्या शेजारी खड्डा का केला असे विचारले असता त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी मला दगडाने व मुलाला चाकूने मारहाण करून जखमी केले.’

सविता शरद कातोरे (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण बबन कातोरे, बबन नामदेव कातोरे, रंजित बबन कातोरे, शोभा बबन कातोरे (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता कातोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘राजेंद्र लाळगे यांच्या जागेत सेफ्टी टँकचा खड्डा खांदल्याच्या कारणावरून मला व माझ्या पतीला शनिवारी (2 नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित आरोपी यांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. मी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकाँर्डिग करत असताना बबन कातोरे याने डोक्यात दगड फेकून मारला. मुलावर खोटा गुन्हा दाखल करून शिक्षण बंद करण्याची धमकी दिली’. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोन गटात राडा! शेतातला वाद पेटला पुढे नको तोच प्रकार घडला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निमगाव वाघा शिवारात पाइपलाइनच्या किरकोळ वादातून दोन गटात राडा झाल्याची...

नगरमध्ये दोस्तीत कुस्ती! मित्रांचा मित्रावर हल्ला; दिल्ली गेट परिसरात खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दुचाकी आडवी लावण्याच्या वादातून मित्रांनी मित्रावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची...

पारनेर हादरले! बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

तालुक्यात एकाच आठवड्यात दुसरी घटना; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक पारनेर / नगर सह्याद्री पारनेर...

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17...