spot_img
अहमदनगर'नगर शहरात आंब्याअगोदर चिकूचा गोडवा'

‘नगर शहरात आंब्याअगोदर चिकूचा गोडवा’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर शहरात केसर आंब्याअगोदर आता चिकूचा गोडवा चाखायला मिळत आहे. शेतकऱ्यांकडून चिकूची शेतबांधावर तसेच घराच्या अवतीभवती लागवड केली जाते. त्यांना यावर्षी चांगली फळे लागली असून बाजारात विक्रीसाठी दाखल महिन्यापूर्वीच दाखल झाली आहे. ग्राहकांकडून चिकू अतिशय गोड असल्याबाबत सांगण्यात येत आहे.

येत्या काळात चिकूचे उत्पादनात वाढ होणार असल्याचे चित्र असून मोठ्या प्रमाणावर चिकू बाजारपेठेत दाखल होईल असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान चिकू लागवडीसाठी उत्तम निचराची खोल आणि मध्यम काळी जमीन योग्य राहत असल्याने ती निवडून शेणखत आणि कंपोस्ट खत मातीत मिसळू मातीची गुणवत्ता वाढवून चिकू लागवड करण्यात येते. चिकूचे उत्पादन तीन ते चार वर्षा सुरू राहते. यंदाही एप्रिल मे मध्ये चिकूच्या कलमांची लागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चिकू खाण्याचे अनेक फायदे आहे. चिकू फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता कमी होते. चिकूमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरामधील हानिकारक घटकांना नष्ट करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. चिकूमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे हृदयासाठी आवश्यकआहे. चिकूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने पोट भरण्याची भावना निर्माण होते आणि जास्त खाण्यापासून रोखते.

त्यामुळे वजन व्यवस्थापनात मदत होते. चिकूमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. चिकूमध्ये विटामिन एसी आणि ई असते जे त्वचेसाठी चांगले आहे. चिकूमध्ये पोटॅशियम असते. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. चिकूमध्ये विटामिन ए असते जे डोळ्यांसाठी आवश्यक असते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटांत राडा; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्ताच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक ते गोपी...

‘महिलेला डंपर खाली…’; नगरमध्ये वाळू तस्करांचा धुमाकूळ!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू व गौण खनिज तस्करांचे कारनामे नेहमीच समोर येत...

बळीराजाला खुशखबर! राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वस्तू मिळणार विनामूल्य

मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील शेतकरी, घरकुल लाभाथ आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली...

महापालिकेचे उत्पन्न वाढणार; इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदीत धक्कादायक बाबी उघड

४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण / नागरिकांनी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे : आयुक्त...