सुनील थोरात यांची माहिती
पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी असणार्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पारनेर तालुयात ६४२४१ बहिणींना लाभ झाला असल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी दिली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी तालुयातून सुमारे ६७३१५ भगिनींनी अर्ज दाखल केले होते, त्यामध्ये फक्त १५६ अर्ज नामंजूर झाले असून ६०४ अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा पाठविले आहेत, तसेच २३१४ अर्ज नव्याने दाखल झाले असल्याची माहिती सुनील थोरात यांनी दिली आहे.
तालुयातील एकही भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले होते आणि त्यांच्या आदेशानुसार अध्यक्ष या नात्याने सर्व सरकारी यंत्रणेसोबत समन्वय साधून तालुयातील सर्वच भागिनींपर्यंत पोहचण्याचे काम चालू आहे आणि यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे सुनील थोरात यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून खासकरुन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात सरकार अतिशय लोकप्रिय झाले आहे. पालकमंत्री यांच्या आदेशाने पारनेर तालुयात सर्व सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करणार असून एकही लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे सुनील थोरात यांनी सांगितले आहे.