अहिल्यानगर पोलिसांची कारवाई । २३ महिलासह ३ पुरुष ताब्यात
श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेदरम्यान चोरी आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २६ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २३ महिला आणि ३ पुरुष आरोपींचा समावेश आहे. कथेसाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती असल्यामुळे पूर्वीच्या घटनांचा विचार करून पोलिसांनी विशेष बंदोबस्त आखला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी गस्त, नाकाबंदी, लॉज तपासणी आणि संशयितांवर पाळत ठेवण्यात आली होती.
११ ऑक्टोबर २०२५ रोजी शिर्डी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या अंगावरील दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या शिल्पा पप्पु कुमार (रा. जुसी, जि. अलाहाबाद, उत्तर प्रदेश), पुनम राजेश कुमार ( रा. चितनपूर, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश) अंजली संदीप कुमार (रा. जुकीया, जि. बहराइच, उत्तर प्रदेश), पुजा हनुमान कुमार ( रा. मुगलसराय, जि. चंदौली, उत्तर प्रदेश), दुलारी घुरण कुमार ( रा. जुसी रेल्वे स्टेशन, जि. अलाहाबाद, उत्तर प्रदेश ) उन्नी सुरेशचंद्र पवार (रा. पुरणनगर, जि. जयपूर, राजस्थान) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडवून कटर, ब्लेडसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
पोलीस पथकाने दुसरी कारवाई २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश शाळेजवळ, निर्मळ पिंप्री–लोणी रस्त्यावर केली. शिवमहापुराण कथा स्थळी असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत या टोळीने चोरी व दरोड्याची तयारी केली होती. कारवाईत १० महिला आणि ३ पुरुष अशा १३ जणांना अटक केली आहे. आरोपीमध्ये शिंदु विरु राखडे, देवकाबाई मनिष हातांगळे, छाया गोविंद हातांगळे, भारती कालीन नाडे, पुजा पंकज लोंढे, नंदिनी गुलशन राखडे, उज्वला शिवा सकट, वर्षा निलेश खंडारे, दुर्गा संजय राखपसरे, नंदा संजय सकट (रा. गंगानगर, ता. नेवासा ), सागर रमेश डोंगरे (रा. तार फैल, वॉर्ड क्र. २८, वर्धा), नितीन जगदिश समुद्रे (रा. मस्जिद चौक, फुलफैल, वर्धा), सचिन कुमार सुखदेव महोतो ( रा. झारखंड) यांचा समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून घातक शस्त्रे व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवमहापुराण कथास्थळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दीचा फायदा घेऊन दागिने, पैसे व मौल्यवान वस्तू चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच महिलांना पोलिसांनी काजल मनिष मालवी, चंद्रवती लोधुकुमार हरजन, मायादेवी अमरकुमार हरजन, पुष्पादेवी जसबाल कुमार हरजन, मालादेवी बिसालकुमार हरजन सर्व (रा. रामचाग झोपडपट्टी, जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश) यांना अटक केली. या आरोपी महिलांनी संगनमताने घातक शस्त्रांचा वापर करून चोरी व दरोड्याची तयारी केली होती. त्यांच्या अंगझडतीत चाकू, कटर व ब्लेड मिळून आल्याने, पोलिसांनी तत्काळ अटक करत लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, शिर्डी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस निरीक्षक संदिप कोळी, पोलीस निरीक्षक प्रविण सांळुके, पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सपोनि महेश वेसेकर, सपोनि वाळके, पोसई सागर काळे, पोसई चौधरी, श्रेपोसई विखे व बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवान यांनी केली आहे.