spot_img
अहमदनगरनगर तालुुक्यात कर्डिलेंनी रोखला खा. लंकेंचा वारु

नगर तालुुक्यात कर्डिलेंनी रोखला खा. लंकेंचा वारु

spot_img

पारनेर, श्रीगोंदा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांत लंके यांना तर राहुरीत समाविष्ट असलेल्या गावांत विखेंना लीड
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीमध्ये विखे-लंके यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचा २९ हजार मतांच्या फरकाने विजय झाला. लंके यांना पारनेर, श्रीगोंद्यात, कर्जत जामखेडमध्ये निर्णायक मताधिक्य मिळाले. भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते, कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे लंके यांचा वारु थोपवू शकले नाही. परंतु, नगर तालुक्यात भाजपाचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे नीलेश लंके यांचा वारु थोपविण्यात यशस्वी झाले आहेत. नगर तालुक्यात विखे-लंके यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचे पहावयास मिळाले. मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरुन नगर तालुक्यात विखे लीडवर असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील बहुतांश गावांत विखे-लंके यांच्यात मोठी चुरस पहावयास मिळाली. तालुक्यातील बुर्‍हाणनगर, जेऊर, शेडी, पोखर्डी, पिंपळगाव माळवी, दरेवाडी, वडारवाडी, बाराबाभळी, पांगरमल, सोकेवाडी, निंबळक, घोसपुरी, सारोळा कासार, अकोळनेर, खंडाळा, चास, नवनागापूर, वडगाव गुप्ता या गावांत सुजय विखे पाटील यांना मताधिक्य मिळाले तर पिंपळगाव उजैनी, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, उदरमल, वाकोडी, चिचोंडी पाटील, अरणगाव, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, देवळगाव सिद्धी, वाळकी, बाबुर्डी घुमट, भोरवाडी, अस्तगाव, सोनेवाडी, देहरे, पिंपळगाव वाघा, नांदगाव, विळद, खारे कर्जुने, इसळक, वडगाव गुप्ता, नेप्ती, रुईछत्तीशी, गुंडेगाव या गावांमध्ये खा. नीलेश लंके यांना मताधिक्य मिळाले. दरम्यान गत निवडणुकीत विखे पाटील यांना नगर तालुक्यातून तब्बल 50 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते. ते या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात कमी झाले. आताच्या निवडणुकीत विखे यांना किरकोळ लीड मिळाले.

गत विधानसभेला मिळालेले लंके यांचे मताधिक्य घटले
गत विधानसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील परंतु पारनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमध्ये नीलेश लंके यांना सुमारे २३ हजारांच्या पुढे मताधिक्य मिळाले होते. विधानभेला लंके यांच्या विजयात नगर तालुक्यातील गांवाचा मोलाचा वाटा होता. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावांमधून विखे यांच्यापेक्षा लंके यांना अवघे साडेचार हजारांचे लीड मिळाले असल्याचे निकालाच्या आकड्यातून समोर आले आहे. याच गावांनी विधानसभेला २३ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते. त्यामुळे लंके यांचे नगर तालुक्यातील मताधिक्य घटले आहे.

बुर्‍हाणनगरकरांची विखे पाटलांना खंबीर साथ
लोकसभा निवडणुकीत पारनेर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेडमध्ये खा. लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. परंतु, खा. लंके यांना नगर तालुक्यात मताधिक्य मिळू शकलेले नाही हे मतांच्या आकडेवारीवरुन लक्षात येते. दरम्यान भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांच्या गावात कोणाला लीड मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु मतांच्या आकडेवारीवरुन सुजय विखे पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाल्याचे दिसून येत आहे. बुर्‍हाणनगरमध्ये २३८५ मते विखे यांना तर लंके यांना ९४५ मते मिळाली.

विखेंसाठी कर्डिलेंची तर लंकेंसाठी गाडेेंची यंत्रणा
निवडणूक कोणतीही असो नगर तालुक्यात भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात नगर तालुका महविकास आघाडी उभी राहते. लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते कर्डिले विखे पाटलांसोबत असल्याने नगर तालुका महाविकास आघाडीने लंके यांना साथ देत पक्षादेश पाळला. असे असले तरी या निवडणुकीत प्रचारादरम्यान नगर तालुक्यातील नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल करण्याची संधी सोडली नाही. तसेच नेत्यांनी आपापल्या गावांत आपल्या नेत्याला चुरशीने मतदान घडवून आणले. विखे यांच्यासाठी कर्डिले यांच्या यंत्रणेने मेहनत घेतली. युवा नेते अक्षय कर्डीले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, सभापती भाऊसाहेब बोेठे, अभिलाष पाटील घिगे, संतोष म्हस्के, उपसभापती रभाजी सूळ, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर लंके यांच्यासाठी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, शरद झोडगे, प्रताप पाटील शेळके, उद्योजक अजय लामखडे, संपतराव म्हस्के, माजी सभापती रामदास भोर, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, रोहिदास कर्डीले यांनी यंत्रणा राबविली.

सासरवाडीत खा. निलेश लंके यांना मोलाची साथ
गत विधानसभा निवडणुकीमध्ये नीलेश लंके यांना नगर तालुक्याने मोठे मताधिक्य दिले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण नगर तालुक्यात विखे-लंके यांच्यात मोठी चुरस पहावयास मिळाली. खा. नीलेश लंके यांची आजोळ व सासरवाडी असलेल्या अरणगावमध्ये लंके यांना मताधिक्य मिळाले आहे. विधानभा निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही सासरवडीकर खा. लंके यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दिसून आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...