अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विवाहितेचा सासरी छळ केल्याचे अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहे. पती–पत्नीत समझोता करण्याचा प्रयत्न येथील भरोसा सेलकडून केला जात आहे. मात्र समझोता न झाल्यास गुन्हा दाखल केला जात आहे. दोन विवाहितांचा सासरी छळ झाल्याप्रकरणी एमआयडीसी व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
सध्या एमआयडीसी परिसरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रतीक दत्तात्रय पोपळघट, दत्तात्रय बापूराव पोपळघट, मुक्ता दत्तात्रय पोपळघट, नणंद धनश्री दत्तात्रय पोपळघट (सर्व रा. शिरूर, जि.पुणे ) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना पतीसह सासरच्यांनी मानसिक, शारिरीक त्रास देऊन छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद हल्ली कापूरवाडी (ता. नगर) येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पती राहुल रावसाहेब निमसे, सासरे रावसाहेब राजाराम निमसे, सासु कलाबाई रावसाहेब निमसे, भाया अमोल रावसाहेब निमसे (सर्व रा. बुऱ्हानगर, ) यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर फिर्यादी नांदत असताना त्यांना पतीसह सासरच्यांनी मानसिक, शारिरीक त्रास देऊन छळ केला. सतत आजारी असते, तिला काही तरी आजार आहे, असे म्हणत मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.