spot_img
अहमदनगरनगर-मनमाड महामार्गावर अपघातात; एक ठार

नगर-मनमाड महामार्गावर अपघातात; एक ठार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर – मनमाड महामार्गावरील विळद (ता. नगर) शिवारातील हॉटेल जय मातादीसमोर घडली. रूपेश मच्छिंद्र राऊत (वय २९ रा. केंदळ ता. राहुरी) असे मयत तरूणाचे नाव आहे.

त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब कचरू राऊत (वय ४९ रा. केंदळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपेश हे पुणे येथून केंदळ येथे नगर – मनमाड महामार्गावरून महींद्रा बोलेरो घेऊन येत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास विळद शिवारात हॉटेल जय मातादीसमोर बोलेरोला ट्रकने धडक दिली. या धडकेत रूपेश यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक अपघाताची खबर न देता तसेच मदत न करता तेथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...